गुरुः साक्षात्परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥
नमस्कार,
आज 'अर्पण' वेबसाईट पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे एक नवीन मंच Portal.myarpan.in इथे आपल्याला wallpapers, pdf आणि बरेच काही download करता येईल. तसेच Shri Dattguru Facebook App, Shri Swami Samrtha Facebook App नामावली वापरता येईल, जी आपण आपल्या Facebook wall वर Share करू शकता. Portal.myarpan.in वर आपल्या विविध आध्यात्मिक उपक्रमात सामील होऊन आपली प्रतिक्रिया, भावना, भक्ती आणि सेवा श्री दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करता येईल. ह्या सेवेचे मूल्य असेल आपली श्री दत्तगुरुंवरील निस्सीम भक्ती आणि आपला निर्मळ सेवाभाव अन्य काही नाही.
अर्पण हा मंच वैश्विक शक्ती, ईश्वर, ईश्वरिक अवतार, संत, भक्त अश्या सर्वांना समर्पित आहे. अर्पणद्वारे श्री दत्तगुरुरायांच्या चरणी सर्व दत्त भक्तांना एकत्र आणण्याचा हा एक प्रयास आहे. बाकी साक्षी श्री गुरु आहेतच..!!
आपण अर्पणद्वारे कार्यरत असलेल्या दत्तगुरू (dattguru.myarpan.in) ह्या आध्यात्मिक प्रवाहाचा आस्वाद घेऊ शकता. ह्या website च्या माध्यमातून श्री दत्तगुरूंची नवनवीन माहिती सर्वांपर्येंत पोहोचवण्याचा मानस आहे.
तसेच नामस्मरण, जप आपली आंतरिक शक्ती वाढवून मोहरूपी अंधःकार दूर करते. आपल्या वेदांमध्ये अनेक मंत्र, जप आणि नाम आहे जे मानवाला साक्षात्कार घडवून परिवर्तनास भाग पडतात. देवाच्या, गुरूंच्या नामस्मरणात ती ताकद प्राप्त होऊन काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ ह्या षडरीपुंवर मानव सामर्थ्य प्राप्त करू शकतो. ह्यासाठी अर्पणद्वारे कार्यरत असलेल्या Online जपनाम (japnaam.myarpan.in) ह्या मंचालाही आपण भेट देऊ शकता, जिथे आपण स्वतः आपल्या गुरुमंत्राचा अथवा अन्य कोणत्याही मंत्राचा Online जप करून आध्यात्मिक आणि आत्मिक उन्नतीचा राजमार्ग प्राप्त करू शकता.
ह्या website वरील सर्व मजकूर website ला Credit देऊन Share करू शकता परंतु त्याचे कोणत्याही प्रकारचे पुनर्मुद्रण (Print, Digital, Audio, Video) पूर्व परवानगी शिवाय करता येणार नाही, त्यासाठी Feedback देऊन Site Adminशी संपर्क साधावा.
ह्या मंचावर आपला सहभाग मोलाचा ठरेल. आपण आपली प्रतिक्रिया आणि आपल्याला असलेली माहिती इथे जरूर Share करू शकता.
श्री गुरुदेव दत्त...!!