गोपनीयता नीती (Privacy Policy)

अर्पण हि आध्यात्मिक, धार्मिक तसेच हिंदू संस्कृतीतील मूल्य जपणारी वेबसाईट असून ह्या वेबसाईटला आपण रजिस्टर होत आहात म्हणजेच आपण अर्पण वेबसाईटवरील सर्व अटी, नियमांची पूर्णपणे सहनिषा करून घेतली आहे, आणि आपण अर्पण वेबसाईट कडून वेळोवेळी येणाऱ्या किंवा अपडेट केल्या जाणाऱ्या सर्व अटी, नियमांशी सलग्न आहात आणि आपल्याला त्या पूर्णपणे मान्य आहेत.

अर्पण हा मंच वैश्विक शक्ती, ईश्वर, ईश्वरिक अवतार, संत, भक्त अश्या सर्वांना समर्पित आहे. अर्पणद्वारे श्री दत्तगुरुरायांच्या चरणी सर्व दत्त भक्तांना एकत्र आणण्याचा हा एक प्रयास आहे. अर्पणद्वारा आध्यात्मिक विषयी माहिती मराठी वाचकांपर्येन्त पोहोचवण्यास आम्ही सक्षम आहोत.

आपण काही सामान्य मूलभूत घटकांशी परिचित असालच, तरीही आपल्यासाठी काही मुलभूत घटकांचा आलेख दिला आहे.

  • व्यक्तिगत माहिती (Personal information)
  • कुकीज (Cookie)
  • खाते पंजीकरण (Account Registration)
  • आय.पी अड्रेस (IP address)
  • सर्वर लोग (Server logs)
  • व्यक्तिगत लोग (Personal logs)

अर्पण वेबसाईट वरील सर्व मूलभूत घटक, आपली व्यतिगत माहिती तसेच डेटा ह्यांचे संरक्षण करणे, आपल्याला ह्या वेबसाईट द्वारा मिळणाऱ्या सुविधां आणि त्यांच्यात केल्या जाणार्या सुधारणा, देखरेख, आणि वेबसाईट विकास ह्यासाठी वापरते.

आपली व्यक्तिगत (Personal) गोपनीयता (Privacy) आणि आपला डेटा ह्यांची गोपनीयता (Privacy) जशी आपल्याला महत्वाची आहे तशीच ती आम्हालाहि महत्वाची आहे. आपली गोपनीयता (Privacy) अभाधित ठेवण्यासाठी आपल्याला अर्पण वेबसाईट वरील अटी, नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच अर्पण वेबसाईट वरील अटी, नियम वाचून जाणून घेणे आवश्यक आहे.

नियम आणि अटी (Terms & Conditions)

  • अर्पण Portal, Dattguru आणि Japnaam वरील सर्व लिखित माहितीवर फक्त आणि फक्त अर्पण ह्या मुख्य वेबसाईटचा अधिकार असेल.
  • आपण अर्पण ह्या वेबसाईटचा उपयोग ज्ञानार्जन, आध्यात्मिक आधाराचे संवर्धन ह्यासाठी करावा. ह्या वेबसाईट वरील कोणताही मजकूर, मजकुराचा एखादा भाग, अप्लिकेशन, फोटो किंवा अन्य स्वरूपातला डेटा हा मराठी अथवा अन्य कोणत्याही भाषेत किंवा कोणत्याही माध्यमातून (electronic,print or any media) आपल्याला आपला म्हणून टाकता येणार नाही. अर्पण वेबसाईटच्या Admin सोबत e-mail द्वारा संपर्क करून पुर्वापरवानगीनिशी वेबसाईटला श्रेय (Crediting Back) देणे अनिवार्य आहे.
  • अर्पण ह्या वेबसाईटद्वारा आपल्याला मिळणारी माहिती हि स्व-अभ्यासातून आणि स्व-अनुभवातून लिहिलेली असेल. तेव्हा माहितीचा अभ्यास करताना संदर्भ आणि इतर अन्य घटकांची जी स्थिती असेल त्यानुसारच आपल्या पर्येंत माहिती पोहोचेल. कोणत्याही संदर्भ किंवा इतर अन्य घटकांमधील त्रुटी किंवा बदल ह्यासाठी अर्पण जबाबदार राहणार नाही.
  • अर्पण वेबसाईट हि धार्मिक वेबसाईट आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन अथवा गैरशब्द-प्रयोग अथवा दुसर्यांच्या धार्मिक भावनेला धक्का लावणे अथवा त्या भावना भडकावणे अथवा धार्मिक वादांची चर्चा करणे ह्या पैकी काही अथवा अन्य कोणतही गैरव्यवहार जो ह्या वेबसाईटची पवित्रता अभाधित राखण्यास पूरक नसेल अश्या व्यक्तीचा IP ताबडतोब प्रतिबंधित केला जाईल.
  • अर्पण ह्या वेबसाईट वरील मजकूर अन्य दुसरीकडे कुठेही आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. पर्यायी आपले ह्या वेबसाईटवरील रेजिस्ट्रेशन Digital Millennium Copyright Act द्वारा ताबडतोब रद्द करण्यात येईल आणि आपला IP address प्रतिबंधित केला जाईल. आणि ह्या सर्व कारवाईसाठी वेबसाईटला आपण जबाबदार ठरवू शकत नाही.